Powered By Blogger

Tuesday, 6 September 2022

What does 'Anis' say about Ganeshotsav ?

What does 'Anis' say about Ganeshotsav ?

Maharashtra Andhhshradha Nirmulan Samitee (Maharashtra ANIS) works in accordance with the principles of the Constitution of India.  According to Article 25 of the Indian Constitution every citizen has freedom of religious practice, propagation, belief and worship .

So if any citizen is celebrating Ganeshotsav as part of his faith, there is no reason for him to oppose Anis, and Anis never did. 

However, in the same 25 article, it is further stated that if someone's religion-worship and religious conduct endangers public peace, public health, and common morality, then it is not right.
In order to prevent public health and environmental damage due to Ganeshotsav, due to water pollution and air pollution.

Maharashtra govt.has been taking an active role in eco-friendly Ganeshotsav for the past 25 years, respecting the faith and worship of the Annis people. Lakhs of Ganesh idols are installed in Maharashtra.  Almost all Ganesh idols contain mercury and lead.  They are painted with toxic chemical dyes.  As they are made of Plaster of Paris, they become solid like stone on contact with water.  Disposing of them in rivers, drains, streams accumulates their sediment there and causes serious chemical pollution.

Therefore, the water is not suitable for use or drinking.  Rivers, streams, lakes are already heavily polluted.  Rather than immersing the idol in such polluted water, it is always better to immerse the idol in a pure water tank or at home.  We have a shortage of clean drinking water.  Therefore, Maharashtra Anis has implemented many activities to bring about constructive change by taking the stand that it is not appropriate to pollute the pure rivers, streams, lakes and wells by immersing Ganesh idols.

As a part of it, in 2005 before the Aurangabad Bench of Bombay High Court, the working chairman of the committee, Avinash Patil and the founding working Chairman, Shaheed Dr Dabholkar.  A Public Interest Litigation was filed by Dr Narendra Dabholkar.  The court passed the order on February 8, 2011 after hearing the public interest petition.  Based on that, on 3 May 2011, the state environment department issued an order regarding the celebration of eco-friendly festivals.  Guidelines have been issued by this order for Municipal Corporations, Gram Panchayats etc. Local Self Government Bodies, Utsav Mandals, Citizens and NGOs Association  For 15 years prior to 2011, Anis has implemented the campaign 'Donate Discarded Ganesh Idols and Nirmalya' to celebrate an environmentally friendly Ganeshotsav. 

This constructive and creative initiative of Maharashtra Anis has been supported by the roles of the court and the government.

From the beginning, some fundamentalist fanatical organizations misled the society by distorting the environmental friendly role of Maharashtra Anis.  Attempts were made to discredit the committee in the public mind.  He also shouted that the committee was traitorous.  Committee workers used to stand with banners during idol immersion in villages.  Activists used to appeal that idols should be donated, Nirmalya should be taken from Ganesha devotees, idols should not be immersed in running water and should be placed in the tank.  While on the other side, the representatives of the fundamentalist religious organizations used to ring bells and force people to immerse the idols in the river.  The role of Maharashtra Anis in  environment-friendly Ganesh idol immersion and Nirmalya collection is accepted by the government today. 

Since 2011, party organizations in power in the state and local bodies have taken some measures for environmentally friendly idol immersion and clean collection.  Even today, no one publicly opposes this position from the government level.  In fact, such opposition would be in contempt of the court order.  It is interesting to note that even those parties who are said to be associated with the fundamentalist fanatical Sanstha organization, while in power, did not oppose environment-friendly idol immersion and Nirmalya collection from the local self-government bodies even now.  On the contrary, in some places, the role of environmentally friendly immersion of Ganesh idols and clean collection is being presented by them.  So what do those fundamentalist fanatic organizations have to say at such a time?  What do they have to say about the earlier opposition stance?  Or have they realized the limitations of their opposition and are now in favor of the court, the government, the committee's environment-friendly idol immersion and nirmalya collection?  If that is the case, the changed role is very welcome.  We believe in transformation.

It is promising that the government has accepted the work that the committee was doing on environmental enthusiasm.

However, due to lack of administrative will and capacity, the environmental supplemental Ganoshotsav has achieved limited success in Maharashtra in 10 years.

  What happened in 10 years after the state government passed the order? 

So this order is not being properly implemented.  If the order is implemented by Ganesha devotees in every village and city alley, it will definitely help in reducing water pollution.

Therefore, we are appealing to all Ganesha devotees to give preference to an environment-friendly Ganeshotsav.

The state government has clearly mentioned in its order that the local self-government bodies i.e. municipalities, village panchayats should try to prevent the pollution of water and air during festivals.  Artificial ponds, cisterns, troughs should be prepared for immersion of idols.  Floating ponds, artificial ponds should be near festival circles.  Idols, Nirmalya and other worship materials should be disposed of with the advice of the representatives of the local Pollution Control Board.  Use of natural colored idols made from Shadu clay or paper pulp should be encouraged.  Such idols should be made available in public places.  It is also mentioned in this order that the Municipal Corporation, Gram Panchayat should make arrangements to collect wet and dry waste and clean waste and dispose of it properly.

The order has also said that the mandals should worship the idols and immerse them in an environment-friendly manner.  The use of plastic bags by devotees should be avoided.  Do not use thermocol and environmentally harmful materials for decoration.  Preference should be given to the decoration of different colored flowers.  Electric lighting and acoustics should be used sparingly.  The sound level should be controlled according to the time of day and night.  Also, it has been mentioned in this order that eco-friendly colors should be used more and more instead of Gulala.
Environmental protection is a personal responsibility.  Everyone in the society needs to adopt eco-friendly things in their personal life.  While subscribing to public Ganeshotsav mandals in the locality, are the said mandals adopting environment-friendly measures?  The order also said that the citizens should subscribe after seeing this
(Translation : Lalchand kuwar)

■ Author
- Vishal Vimal, pune
Activist, Maharashtra Anis Shivajinagar pune Branch
7276559318

Tuesday, 15 June 2021

कृतिशील प्रखरबुद्धीप्रामाण्यवादी : नानासाहेब

ना. ग. ऊर्फ नानासाहेब गोरे. हे नाव मला माहीत पडले ते, डॉ. अनिल अवचट यांचे 'माणसं' आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे 'भ्रम आणि निरास' ही नव्वदीच्या दशकात प्रकाशित झालेली पहिलीवहिली पुस्तके वाचल्याने. या दोन्ही पुस्तकांना नानासाहेबांच्या प्रस्तावना आहेत. त्यानंतर वाचनात आला तो नानासाहेबांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त 1987 साली प्रकाशित झालेला 'गोरे गौरव ग्रंथ'. या ग्रंथांत अनेक मान्यवरांचे नानासाहेबांबद्दल लेख आहेत. पण त्यात शेवटी स्वतः नानासाहेबांनी लिहिलेला 'तिमिरातुनी तेजाकडे' हा लेख आहे. आयुष्याचा फार मोठा काळ ओलांडून नानासाहेब अनुभव आणि विचारांची शिदोरी घेऊन एका टप्प्यावर उभे असताना हा लेख लिहिलेला आहे. त्यामुळे लेखातील ते शब्द अत्यंत तर्कशुद्ध आणि बुद्धिप्रामाण्यवादी आहेत. ते वाचून सळकन वीज चमकावी तसे डोक्यात चमकले होते आणि त्या विजेचा लख्ख प्रकाश आजही डोक्यात आहे. 

नानासाहेबांची जडणघडण, व्यक्तिमत्व, कृती आणि विचार हे दीपस्तंभ आहे. नानासाहेब म्हणजे भारतातील समाजवादी आणि राजकीय चळवळीतील अग्रगण्य नाव आहे, हे विधान अजिबात धाडसाचे नाही. मात्र नानासाहेबांचे धडाडीचे व्यक्तिमत्व आणि धगधगते विचार पेलविणे मात्र धाडसाचे ठरेल. १९०७ ते १९९३ अशी ८५ वर्षे नानासाहेब जगले. १९३० साली वयाच्या 23 व्या वर्षी मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाल्याने नानासाहेबांना तुरुंगवास झाला. हा सुरू झालेला प्रवास पुढे असाच चालू राहिला. अनेकदा तुरुंगवास, काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना, चले जाव आंदोलन, समाजवादी पक्षाची स्थापना, लोकसभेच्या निवडणुकीत दोनदा पराभूत, तर एकदा काकासाहेब गाडगीळांचा पराभव करून विजयी. समाजवादी पक्षात फूट, प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना, पुन्हा समाजवादी पक्षाचे एकीकरण, राज्यसभेवर खासदार , जनता पक्षाच्या काळात ब्रिटनमध्ये उच्चायुक्त, साधना साप्ताहिकाचे संपादक असा हा नानासाहेबांचा प्रवास झालेला आहे. रोजनिशी, ललित लेख, पत्रे, लेखसंग्रह, भाषण संग्रह, प्रस्तावना, पुस्तक परीक्षणे, तत्वचिंतन,  बालसाहित्य, भारताची पूर्व सरहद्द, अमेरिकेच्या संघराज्याचा इतिहास, आपली संसद अशी 24 पुस्तक नानासाहेबांनी लिहिली. नेहरू, जयप्रकाश नारायण, सर्वपल्ली राधाकृष्णन, कालिदास, मिनू मसानी, राजेंद्र प्रसाद यांच्या 6 पुस्तकांचे अनुवाद नानासाहेबांनी केले आहेत. या सर्व पुस्तकातील निवडक लेख 'नारायणीय' या पुस्तकात आहेत. तसेच न्या. नरेंद्र चपळगावकर, वसंत बापट, ग. प्र. प्रधान यांचेही विशेष लेख या पुस्तकात आहेत. नानासाहेबांचा 'तिमिरातुनी तेजाकडे' हा लेख देखील या पुस्तकात समाविष्ट आहे. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा.

 'नारायणीय' या पुस्तकाची पहिली आवृत्ती ही नानासाहेबांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झाली होती. लेखांची निवड आणि पुस्तकाचे संपादन ग. प्र. प्रधान आणि वसंत बापट यांनी केले आहे. 2001 साली या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करताना 'तिमिरातुनी तेजाकडे' हा लेख त्यात समाविष्ट केला आहे. कालच (15 जून) नानासाहेबांच्या 115 व्या जयंतीचे औचित्य साधून साधना प्रकाशनने 'नारायणीय' पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. अर्थात वीस वर्षांनंतर या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती आली आहे. हे पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांना खूप खूप धन्यवाद दिले पाहिजेत.  या पुस्तकातील लेख म्हणजे नानासाहेबांच्या उंचीचे मापदंड आहेत. पुस्तकाची पार्श्वभूमी मांडताना विनोद शिरसाठ यांनी म्हटले आहे की, 'राजकीय नेते अशी प्रमुख ओळख असणारे नानासाहेब किती शैलीदार व विचारप्रवण करणारे लेखन करीत होते, याचा प्रत्यय हे लेख वाचताना येतो.' त्यामुळे हे पुस्तक सजग मराठी वाचकांनी नक्की वाचले पाहिजे. या पुस्तकाच्या शेवटी कव्हर पेजवर 'तिमिरातुनी तेजाकडे' या लेखतील काही वाक्य उद्धृत केली आहेत. त्यात नानासाहेब म्हणतात की, 'आतापर्यंत मी कोणालाही गुरू केलेले नाही. गांधी किंवा मार्क्सलाही नाही, हे यावरून स्पष्ट होईल. कारण या सतत बदलत्या विश्वाचे आणि मानवसमाजाचे अक्षरचित्र कोणापाशी कितीही दिव्यचक्षु असले तरी तो रेखांकित करू शकेल, असे मला वाटत नाही. कॅमेरा जशी क्षणचित्रे टिपतो तशीच आतापर्यंतच्या ऋषी-मुनींनी, विचारवंतांनी, प्रेषितांनी आणि विद्वानांनी टिपलेली आहेत. ती समाजचित्रे त्या काळाची, तत्क्षणीच्या परिस्थितीची चित्रे आहेत. म्हणून वेदकालीन चिंतन, कुरुक्षेत्रावरील चिंतन, बोधिवृक्षाखालील चिंतन, गॅलिलीच्या आसमंतातील आणि हिरा डोंगरावरील चिंतन हे, आजच्या चिंतनाला बंधनकारक ठरता कामा नये. याचा अर्थ ते सर्वस्वी त्याज्य ठरते, असाही नाही. नीर-क्षीर न्यायानेच त्याचा स्वीकार व्हावयास हवा.' हे वाचल्यावर नानासाहेब काय उंचीचा तार्किक विचार मांडत असतील याचा अंदाज येतो. याच लेखातील काही वाक्य पुस्तकात सुरवातीला छापली आहेत. त्यात नानासाहेब म्हणतात की, 'माझ्या जीवनात मी भावनेपेक्षा विचारांना आणि विचारांहुन कृतीला अधिक महत्व देत आलो आहे. म्हणूनच रामदासाहून शिवाजी थोर, रानडयांपेक्षा फुले थोर, बर्ट्रांड रसेलपेक्षा श्वाईटझर थोर, जे. कृष्णमूर्तींपेक्षा मदर तेरेसा थोर आणि अस्पृश्यतानिवारणासाठी स्पृश्यांची मने वळवू पाहणाऱ्या गांधीजींपेक्षा अस्पृश्यांनाच बंडासाठी उभे करणारे आंबेडकर मला थोर वाटतात.' नानासाहेबांची ही वाक्य वाचकांना कृतीप्रवन करण्यासाठी पुरेशी आहेत.
◆ नारायणीय : निवडक ना.ग.गोरे
    संपादक : वसंत बापट / ग. प्र. प्रधान
    प्रकाशक : साधना प्रकाशन 020 24459635
    किंमत : 300 रुपये /सवलतीत 200 रुपये

© विशाल विमल

Wednesday, 20 January 2021

मतदारांचे मेंदू जागृत करण्याचे अभियान राबवूया

◆ परिवर्तनवादी माणसे, संस्था, संघटनांना आवाहन
आजही ग्रामपंचायत निवडणुका या पद, प्रतिष्ठा, खुन्नस, घराणेशाही, जात, पैसे आणि पक्ष याचसाठी लढविल्या जातात आणि होतात, हे स्पष्ट दिसते. गावच्या सुधारणा करण्यासाठी क्वचित एखादा उमेदवार उभा रहातो. पण त्याने जर दारू, जेवण, पैसे दिले नाहीत तर त्याचा पराभव हा बहुमताने ठरलेला आहे. अनेक ठिकाणी तरुण निवडून आले, पण त्यांनी घाणेरड्या प्रस्थापित राजकारणाचा आधार घेतला आहे. काही ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन तरुण निवडून आले आहेत, मात्र त्यांनीही निवडणुकीत प्रस्थापितांप्रमाणे दारू, मटण, पैसे वाटले आहेत. क्वचित काही ठिकाणी जुने अंगठेबहाद्दर पुढाऱ्यांऐवजी तरुणाईला मतदारांनी कौल दिला आहे.

एका गावातील एका वार्डातील विजयी आणि पराभूत अशा दोन उमेदवारांचे खर्चाचे आकडे मी ऐकले. त्यातील पराभूत उमेदवाराने दीड लाख रुपये आणि विजयी उमेदवाराने निवडणुकीला साडेचार लाख रुपये खर्च केले आहेत. इतका खर्च करून विजयी उमेदवाराला 520 मते आणि पराभूत उमेदवाराला 460 मते मिळाली आहेत. त्या प्रभागात 218 कुटुंब आहेत, त्यातील किती कुटुंबात पैसे, मटणाचे जेवण आणि दारू दिली ? तर मला समजले की, पराभूत उमेदवाराने 70 ते 80 घरात दिले, तर विजयी उमेदवाराने 170 ते 180 घरात  दिले. याचा अर्थ मतदार किती लाचार आहेत हे लक्षात येते. त्यामुळे लाचार मतदार किती लायकीचे उमेदवार निवडून देत असतील हेही लक्षात येते. असे मतदार, असे उमेदवार असतील तर मग पुढील पाच वर्षात कोणता मतदार निवडून आलेल्या उमेदवाराला विकासकामे करा, असे वर मान करून सांगू शकतो ? आणि विकासाला बाजूला सारून निवडणुकीत लाखो रुपये खर्च झालेला पैसा भ्रष्टाचारातून मिळवायचे कोणता उमेदवार सोडू शकतो ?
एक उमेदवार पराभूत झाला, सांगत होता की लोकशाही विकली गेली. मी त्याला विचारले की निवडणुकीत खर्च किती झाला, तर म्हणाला की, माझा अडीच लाख आणि निवडून आला, त्याचा तीन सव्वातीन लाख रुपये झाला असेल. मग मला प्रश्न पडला लोकशाही विकायला तर हाही उभा होता आणि मग असे असेल तर, याला लोकशाही विकली असे म्हणण्याचा अधिकार आहे का ? खरे तर हाही अजून एक लाख रुपये अधिक खर्च करून निवडून आला असता तर याला लोकशाही आठवली नसती. एकंदरीत हा प्रकार सर्वठिकानी पहायला मिळतो, ठरवून दिलेल्या निवडणूक खर्चापेक्षा एक पैसाही अधिक खर्च न केलेला विजयी अथवा दुसऱ्या क्रमांकाचा पराभूत उमेदवार सापडणे अवघड आहे. हातावर मोजण्याइक्याच विजयी उमेदवारांनी असे अपप्रकार केले नाहीत, असे जर असेल तर मग अनेक प्रश्न निर्माण होतात.

महत्वाचे हे आहे की प्रस्थापित राजकाऱ्यांच्या विरोधात जाऊन मटण, दारू, पैशाचा वापर न करता निवडून येणे. पण असे चित्र दुर्मिळ आहे. जोवर असे चित्र सर्वत्र दिसत नाही तोवर लोकशाहीच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह आहे. मात्र तोवर माणसामाणसांची खूप मोठी हानी झालेली असेल. ती हानी भरून न येणारी असेलच, पण ती हानी वाढत जाणारी असेल !!

पर्याय एकच रहातो की जात, धर्म, घराणेशाही, पक्ष न पाहता आणि मटण, पैसे, दारू न घेता मतदान करणारे नागरिक तयार करणे. यासाठी मतदारांमध्ये खूप मोठी जागृती आणि सजगता निर्माण करावी लागणार आहे. खरे तर देशातील, राज्यातील कोणतेही सरकार मतदारांना अधिकाधिक शहाणे करण्यासाठी प्रयत्न करत नाही. कारण की लोकांना अज्ञानी, लाचार आणि बावळट ठेवून त्यांनाही मते घ्यायची असतात. ज्ञानी मतदार हे बावळट उमेदवार निवडत नाहीत आणि बावळट मतदार हे ज्ञानी उमेदवार निवडून देत नाही. त्यामुळे राजकारण्यांच्या दृष्टीने लोक बावळट राहिलेले अधिक हिताचे आहे. अर्थात हे सर्व बदलायचे असेल तर माणसामाणसांचा विचार करणारी परिवर्तनवादी माणसे, संघटना, संस्था यांनी लोकांचे मेंदू विवेकी करण्याचे अभियान राबवायला हवे. 

- विशाल विमल
--------------------

Friday, 18 December 2020

भाग 3 : व्यक्तीस्वातंत्र्य, सामाजिक बंधने आणि मैत्री, प्रेम

🌷 ती : hi
🌱 तो : बोल, काय म्हणतेस ? आपण दोन दिवस खूपच बोललो ना.
🌷 ती : होय रे. इतकं सविस्तर सोशल मीडियावर बोलणं म्हणजे खूपच झालं. 
🌱 तो : होय. विषयच तसा मुक्तसंवादाचा आहे ना.
🌷 ती :  पण मला हे समजत नाही की इतके मुक्त संबंध ठेवायचे असतील तर लग्नाचा देखावा तरी कशाला? निव्वळ औपचारिकता म्हणून?
🌱 तो :  हे तुझे म्हणणे मला शंभर टक्के मान्य आहे. अनेकांची इच्छा असूनही सामाजिक बंधने म्हणून लोक लग्न करतात. काही जण धाडसाने आज ही लिव्ह इनमध्ये रहातात. तुम्ही कितीही क्रांतिकारक असला तरी हजारोवर्षांची संस्था एकट्याला मोडता येत नसते आणि सर्वांचा विरोध पत्करून एकानेच किल्ला लढविण्यासाठी त्याला आयुष्यही पुरणार नाही.
🌷 ती : तू लग्न का केलंस? Live in चा पर्याय का स्वीकारला नाही?
🌱 तो : होय. मी live in चा पर्याय निवडला होता. पण मला जातीबाह्य लग्न करून दोन जातीच्या व्यक्ती एकत्र नांदू शकतात, हा आजच्या परिस्थितीत संदेश द्यायचा होता. मी त्याला अग्रक्रम दिला. केवळ आणि केवळ या उद्देशाने मी लग्न केले.
🌷 ती : तू मानत नाहीस ना विवाह संस्था? मग याच संस्थेला शरण का गेलास? त्यासाठी लग्नाच्या औपचारिकतेची गरज नव्हती. लग्न न करताही ते साध्य करता आलं असतं.
🌱 तो : शरण नाही, त्या संस्थेचे फक्त नाव वापरले
आणि मी या समाजाचा भाग आहे. इच्छा नसताना काही नियम पाळले जातात.  नवीन रचना मी एकटा नाही ना करू शकत. पण प्रयत्न करतो आहे.  
🌷 ती : हेच ते. आपण समाजाचा एक भाग आहोत म्हणून सामाजिक नियम आपल्यालाही लागू होतात. त्यात जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं हाही नियम आहे आणि ते स्त्री पुरुष सगळ्यांनाच लागू आहे. 
🌱 तो : एकनिष्ठतेबद्दल आपण बोललो आहोत. आजच्या कुटुंब, विवाह संस्थेतील जेजे तोडणे, झुगारने शक्य आहे, ते झुगारावे, तोडावे. तिच्यात राहूनच त्या व्यवस्थेला आतून शक्य तितके धक्के दिले पाहिजेत. 
🌹 ती : लग्न सुद्धा स्वातंत्र्याला बाधक आहे, कारण शेवटी तेही एक सामाजिक बंधन आहे.
🌱 तो : होय की. 
🌷 ती : Exactly हेच म्हणायचंय मला. सामाजिक नियम मान्य असतील तरच लग्न करा, अन्यथा करू नका. तुमच्यावर कोणीही जबरदस्ती करत नाही. पण आयुष्याचा जोडीदार म्हणून कुणाला स्वीकारलं आहे, तर तिच्याशी प्रामाणिक रहा, पारदर्शक रहा. खरं प्रेम असेल, तिथं विश्वास आपोआप येतो. तिथं कसलीही लपवाछपवी करायची गरजच पडत नाही.
🌱 तो : यातील अनेक वाक्य एकमेकांशी परस्पर विसंगत आहेत.
1) सामाजिक नियम कुणी ठरवले ? जसे सामाजिक नियम पळायचे असतात, तसे ते मान्य नसतील तर तोडायचेही असतात. मात्र सामजिक नियम मान्य नसतील तर समाजात राहू नये, असे बोलणे अयोग्य ठरेल. 
2) कुटुंबाचे, विवाहाचे नियम कुणी ठरवले. 100 वर्षांपूर्वी होते, ते आज नियम नाहीत. मग ते कुणी आणि का बदलले. मग आज कुणी बदलत असेल तर त्यात गैर काही नाही.
3) लग्न नव्हे तर प्रत्येक नात्याची कमिटमेंट असते. संसार म्हणून जबाबदारी आणि साथीदाराचे समाधान हे कुटुंब, संसार याची कमिटमेंट आहे, असे मी मानतो. या पलीकडे कोण काय करते, हा व्यक्ती स्वातंत्र्य भाग आहे. ते स्वातंत्र्य घेतले म्हणजे कमिटमेंट नाही, असे म्हणणे हे म्हणणे गैर आहे.
पण कुणी कौटुंबिक जबाबदारी पाळली नाही, साथीदारचे समाधान केले नाही आणि बाहेर प्रेम मैत्री शोधली, तर अशा व्यक्तीची संसारात कमिटमेंट आहे असे कुणी म्हणत असेल तर ते हास्यास्पद आहे. आणि आज असंख्य लोक असेच वागतात आणि यालाच कमिटमेंट म्हटले जाते. त्यामुळे संसार हे शोषनाचे मूळ बनले आहे.
4) खरं प्रेम आणि खोटं प्रेम असे काहीही नसते. प्रेम हे प्रेम असते. बाकी कल्पनाविलास आहे. 
5) विश्वास, एकनिष्ठता, सुचिता, प्रामाणिकपणा हे शब्द संसारात बंधन म्हणून वापरले जातात.
🌷 ती : आपल्याला कुटुंब, विवाह संस्था मान्य नसतानाही विशिष्ट सामाजिक नियमांचा स्वीकार करायला लागणे, हे आपण हतबल आहोत किंवा समाज वरचढ आहे, हे दर्शवते. समाज बदलण्याची ताकद आपल्यात आहे ना? मग का करावेत मनाविरुद्ध असे नियम मान्य? का जावं अशा नियमांना शरण? मला एवढंच कळतं, जे नियम आपल्याला मान्य नाहीत, ते बिनधास्त उडवून लावावेत. केवळ समाजाचा एक भाग म्हणून त्यांचा आश्रय घेऊ नये.
🌱 तो : अनेकांनी पूर्वीपासून आणि आजही या विवाह, कुटुंब व्यवस्थेचे जाचक नियम लावलेच की धुडकावून. आंतरधर्मीय विवाह हा विवाह संस्थेचा नियम नाही. बालसंगोपन, स्त्रीला घर कामात मदत हा विवाह संस्थेचा नियम नाही. हे नियम मोडले की अनेकांनी. विवाह संस्थेचे सर्व नियम एक व्यक्ती नाही मोडू शकत. एकाने नियम मोडणे हेही क्रांतीकारी असते. मुलींनी शिकू नये, याबाबत ही आता तू प्रतिवाद करते तसे तेव्हा केले जायचे. आपल्या व्यवस्थेत तर मुलींनी शिकणे म्हणजे पाप, धर्म बुडाला, स्त्री बिथरली असे समजले जायचे. महात्मा फुलेही सर्व नियम नाही नाकारू शकले, पण स्त्री शिकली पाहिजे. हा नियम त्यांनी तोडला. एक नियम मोडला तरी खूप मोठे परिवर्तन घडले. समाजाचे सर्व चुकीचे नियम, प्रथा एका झटक्यात मोडण्याची अपेक्षा ठेवणे हे बाळबोध आहे आणि मोडायचे तर सर्व नियम मोडा नाही तर मग आहे ते सर्व स्वीकारा, हे तर अतिबालिश झाले. कोणतेही परिवर्तन टप्प्याटप्य्याने येते हे लक्षात घेतले पाहिजे.
🌷 ती : तुझे विचार चूक आहेस, असं मी म्हणत नाही. पण एखादी विचारधारा स्वीकारताय तर पूर्णपणे स्वीकारा ना. आपल्या सोयीनुसार हे अर्ध, ते अर्ध असं नको.
🌱 तो : व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पूर्णतः हेच स्वीकार अथवा तेच स्वीकारा, असे म्हणायला तसा काही अर्थ नाही. तिथे हवे ते स्वीकारले जाते. पण तरी आपण या मुद्द्याकडे कायद्याच्या नजरेतून पाहू. आपण कायद्याच्या राज्यात रहातो. येथे विवाहबाह्य संबंध अमान्य नाही. त्यामुळे विवाहबाह्य संबंध ठेवू नयेत, या विवाह संस्थेच्या अलिखित नियमाला अर्थ उरत नाही. आणि हेच करा किंवा तेच करा, यालाही अर्थ नाही. 
🌷 ती : विवाहबाह्य संबंध कायद्याला अमान्य आहेत.
तो : 150 वर्षे जुने असलेले भारतीय दंड विधान संहितेतील कलम 497 सर्वोच्च न्यायालयाने का रद्द केले ? आणि त्याने काय स्वतंत्र मिळाले, हे नक्की वाच. दोन वर्षपूर्वीच विवाहबाह्य संबध खुले केले. तेही मोदी सरकारच्या काळात. या कलमांतर्गत पूर्वी विवाहबाह्य संबध असतील तर त्या स्त्रीचा नवरा दुसऱ्या पुरुषवर केस करू शकायचा. पाह किती बोगस कलम होते. एखाद्या स्त्रीला संबंध हवे असतील, तिने ठेवले, तिला मान्य आहेत संबंध आणि केस कोण करणार तर तिचा नवरा. आता पतिपत्नी विवाहबाह्य संबध ठेवू शकतात. नवरा दुसऱ्या पुरुषावर केस करू शकत नाही. फसवणूक झाली तर एकमेकांवर दोघेच केस करू शकतात,
हा नियम तसा सगळीकडे आहे. तो इथेही लागू होतो.
ती :  अर्थात हे ज्याचं त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. कुणी कसं वागावं, हे दुसऱ्यांनी कसं ठरवायचं ? मनावर दडपण येणार नाही, अशा पद्धतीने वागावं बस.
🌱 तो : स्वातंत्र्य मी मानतो, पण स्वराचार मानत नाही.
मी जे सांगतो आहे तसे स्वतंत्र येईलच,  पण अजून खूप शतके जावी लागतील.
🌷 ती :  तुझं म्हणणं बरोबर असेलही. पण मी एवढंच म्हणेन की, आपला कायदेशीर जोडीदार सोडून इतर कुणाशी संबंध ठेवण्यास आपल्याला काही नैतिक अडचण वाटत नसेल, आपण कम्फर्टेबल असू तर खुशाल ठेवावेत संबंध. पण आपण काही चुकीचं करतोय, आपल्या जोडीदाराशी cheating करतोय, या भावनेनं आपल्याला अपराधी वाटायला नको.
🌱 तो : अत्यन्त बरोबर आणि या व्यतिरिक्त वागण्यात समाधान देखील नाही. आपण दोघे या एकाच मतावर आलो का फायनली ?
🌷 ती : असू दे की मतभेद. मित्र आहोत म्हणून प्रत्येक गोष्टीवर एकमत असलंच पाहिजे असं कुठं आहे?
🌱 तो : मला मतभेद असण्यात काहीही अडचण नाही.
मदभेद कुठवर कमी झाले, यासाठी मी विचारले
आणि तुझे ते समारोपाचे वाक्य आणि मी कालपासून जे बोलतोय, ते एकच आहे. त्यामुळे मी मतभेद कमी झालेत असे समजतो.
🌷 ती : असू नये एकमत. रंगत येते छान.
🌱 तो : आपण दोघे या मतावर आलो का फायनली. 
🌷 ती : असं म्हणू शकतो.!!
तो : खूप वर्षांनी मी बोललो या विषयावर बघ
🌷 ती : बरं वाटलं असेल नं?
🌱 तो : जगण्यात, मनात विचार तर आहेच
पण बोलल्यावर बरे वाटले
🌷 ती : All credit goes to me
🌱 तो : होय. चल बाय
🌹 ती : बाय.
#समाप्त

(टीप : तो आणि ती कोण हे शोधण्यापेक्षा या संवादातील मुद्दे शोधून त्यावर विचार करूया !)

© विशाल विमल
--------------------------

भाग 2 : विवाह-कुटुंब संस्था आणि विवाहबाह्य संबंध

🔎 तो : तुला माझे रात्रीचे काय मुद्दे पटले आणि नाहीत. तुझे काय मत आहे. 
🔍 ती :  खरे तर तुझे विचार इतके मोकळे आहेत. त्यात लग्न ही गोष्ट कुठंच बसत नाही. कारण लग्न म्हटलं की कमिटमेंट आली. अर्थात तुझं मत चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो
🔎 तो : कमिटमेंट आहेच माझी. पण ती संसारिक जबाबदारीशी आहे. सहजीवनाशी कमिटमेंट आहे. कमिटमेंट ही पुढच्या व्यक्तीला द्यावयाच्या प्रेम, सुख आनंद याच्याशी आहे. या पलीकडे जाऊन मी मैत्री, प्रेम केले तर मी माझी संसारिक कमिटमेंट मोडली, असे होत नाही. 
मला इतके कळते की प्रेम, मैत्री या उदात्त आणि अमर्याद भावना आहेत. त्यांची पूर्ती एकाच ठिकाणी व्हावी आणि होतेच असे म्हणणे हे अनैसर्गिक मत आहे.  ती एकाच ठिकाणी झालीच पाहिजे हा अनाठायी आग्रह आहे. मात्र प्रेमपूर्ती एकाच ठिकाणी होत असेल तर छानच.
🔍 ती : प्रेमपूर्ती एकाच ठिकाणी होत नाही का ?
🔎 तो : प्रेम, मैत्री ही भावना जर उदात्त आणि व्यापक आहे तर ती कोणत्या एकाच व्यक्तीच्या बंधनात अडकून कधी पूर्ण होईलच असे नाही. एकाच वेळी अनेक व्यक्तींशी मैत्री, प्रेम होते. पहिल्यांदा एकाशी, मग एकाशी असेही होते. हे सर्व नैसर्गिक आहे. प्रेम, मैत्रीत एकचएक म्हटले की, त्या नात्यात खरे प्रेम, मैत्री किती आणि केवळ सोबत किती ? हा मोठा प्रश्न आहे. प्रेम, मैत्री या विविधांगी भावना आहेत. एका व्यक्तीकडून त्यातील काही भावनांची पूर्ती होईल तर दुसऱ्या व्यक्तीकडून इतर भावनांची पूर्ती होईल. एकच व्यक्ती सर्व भावनांची पूर्ती करण्यात कमी पडते आणि त्या व्यक्तीकडे भावनांची पूर्ती करच असा आग्रह धरणे हे अयोग्य आहे. उलट या प्रकाराने ज्या भावनांची पूर्ती होऊन दोघांना जे समाधान मिळते, तेही मिळण्यात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे जिथे मिळेल तिथून मैत्री, प्रेम मिळवत रहावे. फुलपाखराप्रमाणे....
🔍 ती : पण कमिटमेंट एकनिष्ठ राहण्याशी सुद्धा असते ना. लग्न या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो जोडणं. अर्थात काया, वाचा मनाने एकमेकांशी आयुष्यभरासाठी एकरूप होणं. अर्थात ही अट नाही, अपेक्षा आहे. आणि ती अपवादात्मक परिस्थितीत लागू पडत नाही. ही कमिटमेंट निभावता येणार नसेल तर लग्नाची औपचारिकता तरी कशाला हवी? Live in चा पर्याय आहेच की. तोही उत्तम पर्याय आहे.
🔎 तो : एकनिष्ठतेशी व्याख्या काय ? आणि कोणतीही पूर्ती होत नसेल तरी एकनिष्ठ का रहायचे ? एकनिष्ठता ही शाश्वत, सुखद, समाधानकारक आणि निखळ आयुष्य जगण्याला बाधक आहे. एकूणच व्यक्ती स्वातंत्र्यालाही बाधक ठरू शकते. खरे तर संसार, लग्न या संस्था स्त्री शोषणाची मुळं आहेत. पुरुषसत्तेने बाईला गुलामीत ठेवण्यासाठी लग्न, संसार, सेक्स याला पावित्र्याचे, एकनिष्ठतेचे आवरण चढवले.
🔍 ती : जिथं खरंच प्रेम आहे, समजून घेणं आहे, तिथं शोषणाला थारा नसतो.
🔎 तो : तुझे असे म्हणणे असेल तर त्यानुसार आजच्या कुटुंब व्यवस्थेत शोषण न झालेल्या अत्यंत कमी व्यक्ती सापडतील. याचा अर्थ कुटुंब संस्थेत प्रेम नाही तर, शोषण आहे. बरोबर का ?
🔍 ती : शेवटी विवाह हे समाज एकसंध ठेवण्यासाठी निर्माण केलेले बंधन आहे. ज्याला ते मान्य असेल त्यानीच लग्न करावे, अन्यथा लग्नाच्या भानगडीत पडू नये. विवाह ही संकल्पना निर्माण होण्यापूर्वी स्त्री-पुरुष संबंध मुक्त होते. त्यात चुकीचं काही होते असे मी मानत नाही. पण जन्माला येणाऱ्या संततीची जबाबदारी कोणी घेईना. म्हणून विवाह ही संकल्पना अस्तित्वात आली. आणि ती मान्य असेल तर तिच्या अटी, शर्ती, नियम पण मान्य असायलाच हवेत. ज्याला ते मान्य नाहीत, त्याच्याकडे विवाह न करता मुक्त संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य आहेच.
🔎 तो : कुणी केले विवाहाचे नियम ? पुरुषांनी ना ? कुणाच्या हिताचे ? स्वतःच्या ना ? तरीही विवाह संस्था पवित्र आणि उदात्त कशी असू शकते. संततीच्या संगोपनासाठी विवाह आणि कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली, हे भर देऊन आज सांगितले जाते. पण त्याला तितकेच कारण नाही. आणि तितकेच कारण असेल तर मग बालसंगोपनात पुरुषांचा वाटा किती असतो ? की उलट गर्भधारणा, मासिक पाळी, बालसंगोपन आणि सेक्सच्या माध्यमातून स्त्रीला पुरुष स्वतःच्या नियंत्रणात ठेवतो. तिची पिळवणूक केली जाते. तिला काबूत ठेवले जाते. असे असेल तर समाज एकसंध ठेवण्यासाठी विवाह, कुटुंब व्यवस्था आवश्यक आहे, असे स्त्रीने का म्हणावे ?
🔍 ती : स्त्रीला नव्हती का या विवाह, कुटुंब व्यवस्थेची गरज ?
🔎 तो : असेलही. पण आज तीच संस्था स्त्रीच्या शोषणाचं मूळ बनली आहे. त्यामुळे आज तरी ही संस्था स्त्रीच्या हिताची दिसत नाही. बाळ हवं ही स्त्रीची नैसर्गिक गरज नाही. विवाहित स्त्रीला बाळ हवं ही समाजाने घडविलेली भावना आहे. त्यामुळे बाळ नको हे तिला नाकारता येते, पण कुटुंब व्यवस्थेत तो तिला अधिकार नाही. कारण पुरुषी सत्ता बळकट करण्यासाठी पुरुषांच्या मेंदूतून विवाह, कुटुंब संस्था उभी केली गेली. त्यातील पहिला भाग हा आहे की, पुरुषी सत्तेला तिच्या भविष्यासाठी पुत्र हवा होता, वारस हवा होता आणि याच काळात स्त्रीला बळाच्या जोरावर पुरुषाला स्वतःच्या काबूत ठेवता येऊ लागले. लैगिक गरज ही स्त्री वैयक्तिक पातळीवर पूर्ण करू शकते. जोडीदार हवा असेल तर तोही भेटतो, पूर्वीही भेटत होता. मग लग्नाची गरजच काय ? पण सेक्ससाठी लग्नाची गरज पुरुषांनी निर्माण केली. स्त्रीच्या लैगिकतेवर पुरुषांना वर्चस्वासाठी हवी तशी मालकी हवी होती आणि यातूनच कुटुंब, लग्न संस्था प्रस्थापित झाल्या आणि स्त्री शोषणाच्या मूळ बनल्या. याकडे खरे लक्ष दिले पाहिजे.
🔍 ती : लग्न, कुटुंब व्यवस्था मग उपयोगाची नाहीच का ? 
🔎 तो : माझं सुरुवातीपासून वाक्य आहे की, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि साथीदार व्यक्तीला समाधान देण्याची जबादारी पार पाडून मग जे करायचे ते करावे. खरे तर प्रत्येक नात्यात ही कमिटमेंट असते. संसार आणि लग्न संस्था स्त्रीवर लादण्यात आल्या. पुरुष आजही मुक्त आहे. संसाराचे नियम हे कोणत्या कायद्याने लिहिलेले नाहीत. त्यामुळे ते आज आपण कालसुसंगत ठेवू शकतो.
🔍 ती : असो. बोलू नंतर.
🔎 तो : होय. बाय.

(टीप : तो आणि ती कोण हे शोधण्यापेक्षा या संवादातील मुद्दे शोधून त्यावर विचार करूया !)

© विशाल विमल
--------------------

प्रेम, प्रेमातील बंदीस्थपणा आणि विवाहबाह्य प्रेमसंबंध (भाग : 1)

● तो : प्रेमात पड, म्हणजे प्रेम कविता सुचतील.
◆ ती : पडून, आपटून झालंय. आता नको परत.
● तो :  ते तुमचं प्रेम होतं,  अस मला तरी वाटत नाही.
आणि प्रेम एकदाच, एकाच व्यक्तीवर होते ही अंधश्रद्धा आहे.
◆ ती : परत तितक्या intensity नं कोणी आवडलंच नाही. तुलना होते नुसती.
● तो : तुलना केली की मग अवघडच. वेगवेगळे गुण, दुर्गुण असतात प्रत्येक व्यक्तीत. मला आता कुणी आवडले तरी मी करेल प्रेम. 
◆ ती : बायको झोडपेल नं चांगली.
● तो : नाही, हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. 
◆ ती : असेलही स्वातंत्र्य. पण आपल्या आयुष्याचा जोडीदार वाटून घेण्याएव्हढं मन मोठं नसतं कोणाचंच. म्हणजे असूया निर्माण होतेच मनात.
● तो : नवरा बायको म्हणजे एकमेकांच्या वस्तू नाहीत.
इतरांनी कुणी घ्यायच्या नाही किंवा इतरांकडे जायचं नाही.
--------
● तो : प्रेम, मैत्री, सेक्स या उदात्त भावना आहेत. त्या अमर्याद आहे. समजा, नवराबायको हे कौटुंबिक जबाबदाऱ्या,  शारीरिक, भावनिक गरजा एकमेकांच्या पूर्ण करत असतील आणि अजून अन्य ठिकाणी त्यांचे संबंध प्रस्थापित झाले तर त्यात गैर काय आहे.
◆ ती : असं बोलणं सोपं आहे. प्रत्यक्षात करणं कठीण आहे.
● तो : होय, म्हणून तर सांगतो, असे वागायला खूप प्रगल्भता लागते. 
◆ ती : तू बायकोला सांगू शकशील की माझे दुसऱ्या कोणाशी संबंध आहेत? आणि ती स्वीकारू शकेल हे? आणि तिनं असं केलं तर तू स्वीकारू शकशील?
● तो : आजवर तर बोलण्याच्या पातळीवर वैयक्तिक आणि जाहीर व्यासपीठावर अशी मांडणी दोघांनी करत, हे मान्य केले आहे. जगण्याच्या पातळीवर अवघड नाही. आणि मी तिला अडविणारा कोण ? आणि तिने दुसरे कुणावर प्रेम केले तर ती माझे काय हिरावून नेत आहे ? माझी बायको म्हणून ती संसारिक जबाबदाऱ्या सांभाळते, त्यापलीकडे तिचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी कोण तिला अडविणारा ?
◆ ती : मन तयार तरी होईल का असं करायला? आनंद तरी वाटेल का मनाला?
● तो : आपल्यावर एकेरी आणि बंदीस्थ संस्कार झाले आहेत. उदात्त संस्कार झाले नाहीत. प्रेम ही भावनाच उदात्त आहे. आई, वडील, भाऊ बहीण यांच्यावर प्रेम करताना नाही हा प्रश्न पडत ? मित्र - मैत्रिणी, प्रियेसी - प्रियकर येथे का हा प्रश्न पडतो ?  कारण या प्रेमात लैंगिकतेचा विचार केला जातो. आणि आपल्याकडे लैंगिकतेमध्ये बंदीस्थपणा आणून ठेवला आहे. नॉर्मल विचारच केला जात नाही. खरे तर सेक्सशिवाय मैत्री, प्रेम असे नाते छान तयार होते. पण आपल्याकडे सेक्श म्हणजेच मैत्री प्रेम समजले जाते आणि त्यामुळे खूप बंधने लादली जातात मैत्री प्रेम यावर.....
◆ ती : आपल्या जोडीदारकडून सगळ्या गरजा पूर्ण होत असतील तर आपण इकडे तिकडे का जाऊ?
● तो : खरे तर गरज ही नुसती गरज नाही. प्रेम, मैत्री या उदात्त आणि अमर्याद भावना आहेत. त्या एकाच व्यक्तीकडून पूर्ण होतील हे कुणी सांगितले ?
-----------
◆ ती :  मला ती आपल्या जोडीदाराशी केलेली बेईमानी वाटेल. पण तो सक्षम नसेल तर मी जाईन कदाचित दुसरीकडे. कारण आपल्या इच्छा दडपून टाकणं ही स्वतःशी बेईमानी ठरेल.
● तो : हा तुझा विचार फक्त लैगिकतेबाबत आहे. मी तो सोडून मैत्री, प्रेम याचा विचार मांडतोय. मैत्री, प्रेम करण्यात काय गैर आहे. खरे तर सेक्स करण्यात ही काही गैर नाही. पण हा मुद्दा नंतर बोलू.
◆ ती : प्रेम आहे म्हणून शरीर द्यावंसं वाटणं हे सहज आहे. तुला जर कुणाबद्दल प्रेम वाटलं तर तू बायकोला सांगू शकशील मोकळेपणाने?
● तो : 1 लाख 1 टक्के सांगेन. पण तिला सांगायची अथवा तिच्या परवानगीची गरज काय ? असाही माझा प्रश्न आहे
◆ ती : तू सांगेन म्हणतो, पण इतका मोकळा विचार फार कमी लोक करू शकतील. पण तुझा जो दुसरा प्रश्न आहे, त्याबाबत मला असे वाटते की तिला सांगण्याऐवढा मोकळेपणा आणि विश्वास हवा तुमच्या नात्यात?
● तो : पण मला सांग, बायकोला का सांगायचे ? ते माझे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना ? मग मी का सांगायचे ? मी तिच्या बाबतच्या सर्व गोष्टी पूर्ण करतो, तर मग मी तिला त्या पलीकडचे का सांगायचे ? लग्नाअगोदर आपण कुणाशी प्रेम केले, सेक्स केले हे आई-वडील आणि होणाऱ्या बायकोला- नवऱ्याला सांगतो का ?
● तो : समजा एखादी स्त्रीच्या प्रेम मैत्री याबाबतच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. मी वर बोललो तसे. पण त्या स्त्रीच्या नवऱ्याच्या नसतील तर त्या स्त्रीने बाहेर कुणावर प्रेम, मैत्री करायची नाही का ? मग त्या पत्नीचे व्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेले ?
◆ ती :  शरीर, मन, आयुष्य हे सगळं share करतोच की आपण आपल्या जोडीदाराशी.
● तो: पण आपल्या शरीर, मन, आयुष्यावर मालकी नसते जोडीदाराची.
◆ ती : मालकी नसतेच त्याची. तो गाजवत नसेलही. पण आपल्याला त्यालाच मालकी द्यावीशी वाटत असेल तर?
● तो : म्हणून तर मी म्हटलो की, आपल्याकडे संस्कार आहे. तो हाच संस्कार की लग्न म्हणजे पती-पत्नी एकमेकांचे मालक
◆ ती : नाही रे. ती प्रेमाची मालकी असते. आपण स्वतःहून देऊ केलेली. त्यासाठी कोणी आपल्यावर जबरदस्ती करत नाही.
● तो : हा हा हा...त्याला मानसिक गुलामी म्हणतात. प्रेम किती आणि भावना, शरिरावर नियंत्रण अर्थात मालकी किती हे पहा. नवराबायकोत प्रेमाची मालकी असती ना तर प्रेमाची अशी असंख्य उदाहरणे सापडली असती. पण नवराबायकोच्या प्रेमाची उदाहरणे फार नाही. याचा अर्थ त्या नात्यात फार प्रेम नसते. असते ती बहुतांशी शारीरिक मालकी आणि लग्नाची गाठ.
◆ ती : असेलही. जाऊ दे, मी झोपतीये
● तो : जाऊ दे म्हणजे ?
◆ ती : झोप फार आलेली. म्हणून म्हटलं रे.
● तो : मला वाटले की तुझी चिडचिड झाली.
◆ ती : नाही नाही.
● तो : Gn
◆ ती : Gn

(टीप : तो आणि ती कोण हे शोधण्यापेक्षा या संवादातील मुद्दे शोधून त्यावर विचार करूया !)

© विशाल विमल
________________

Friday, 17 July 2020

पुरुषीवर्चस्व आणि कामपूर्तीचे समाधान

शरीरसंबंधांमध्ये आजही पुरुषांची मक्तेदारी असल्यासारखे त्यांचे वर्तन आहे. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी स्त्रीने शरीरसंबंधांमध्ये स्वतः हुन फार काहीही करायचे नाही, असा अलिखित नियम आहे. जे करायचे ते पुरुषाने स्वतः आणि स्वतःला वाटेल तसे करायचे. मात्र हे पूर्णतः चूक आहे. शरीरसंबंधांला संभोग असा अर्थपूर्ण शब्द आहे. शरीरसंबंधांमध्ये स्त्रीपुरुषांचा समान सहभाग असावा, असा त्यातून अर्थ सूचित होतो. त्यामुळे शरीरसंबंधात स्त्रीपुरुष दोघांचाही समान सहभाग असेल तर पुरुषासह स्त्रीचीही कामपूर्ती समाधानकारक होऊ शकते. शरीरसंबंध ठेवताना काही प्रकारांमध्ये स्त्रियांना थोडा पुढाकार घ्यावा लागतो, ते प्रकार पुरुषांनी माहीत करून घेऊन महिलांचाही शरीरसंबंधामध्ये सहभाग वाढवला पाहिजे. बाईने शरीरसंबंधामध्ये सहभाग, पुढाकार घेतला म्हणजे 'ती बाई नीट चालीची नाही', असा चुकीचा गैरसमज करून घेण्याची अजिबात गरज नाही. खरे तर स्त्रीपुरुष शरीरसंबंधांमध्ये स्त्रीचाही सहभाग असणे हे आवश्यक आहे आणि ती स्त्रीची गरजही आहे. तसेच प्रत्यक्ष शरीरसंबंध करण्याअगोदर पुरुषांनी प्रणय केल्यास स्त्रीही उद्दीपित होते. त्यामुळे ती शरीरसंबंधांत सहभागी होऊन पुरुषांच्या कामपूर्तीचे समाधान वाढू शकते आणि तिलाही समाधान मिळते.  

पुरुषांच्या एकूणच कामपूर्तीमध्ये स्त्रीचा सहभाग, पुढाकार महत्वाचा आहे. पुरुषी वर्चस्वासाठी स्त्रीचा सहभाग, पुढाकार नाकारला जाणार असेल तर पुरुषांना कामपूर्तीच्या समाधानालाही मुखावे लागत आहे, हे पुरुष कधी लक्षात घेणार आहेत ? पिढ्यांपिढ्या पुरुषांच्या शरिरसंबंधाच्या मक्तेदारीमुळे तेही कामपूर्तीचे समाधान पुरेपूर घेऊ शकले नाहीत. आणि त्या संबंधात असलेली स्त्री वा अन्य जोडीदारही समाधान घेऊ शकले नाही. त्यामुळे शरीरसंबंधातून मिळणाऱ्या कामपूर्तीच्या समाधानाला संपूर्ण समाजच मुकलेला आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. 

जोपर्यंत स्त्रीला मुक्तपद्धतीने, संकोच न करता वावरण्याचा अधिकार या समाजात दिला जात नाही, तोपर्यंत तीही फुलणार नाही. त्यासाठी स्त्रीला मुक्त आणि निःसंकोचपणे जगू दिले पाहिजे. या निःसंकोचपणे जगण्यातूनच ती शरीरसंबंधांमध्ये पुढाकार घेण्यास तयार होणार आहे. मात्र आजवर स्त्रीच्या लैंगिकतेचा आणि तिच्या निःसंकोचपणे जगण्याचा कधी या पुरुषी व्यवस्थेने विचारच केला नाही. त्यामुळे ती दुसर्‍यालाही जो काही आनंद देऊ शकते, त्या आनंदाला पुरुषही हजारो वर्ष इथल्या खुळ्या कल्पना, रूढी परंपरामुळे मुकला आहे. हजारो वर्ष स्त्रीला पुरुषी वर्चस्वाने दाबल्यामुळे आणि चुकीच्या रूढी-परंपरांमुळे ती या आनंदापासून स्वतः मुखत आली आहे. 

तिच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे. उत्साह आहे. संभोग सुख देण्याची ताकत आहे, हे खास करून पुरुषांनी लक्षात घेण्याची गरज आहे. शरीर सुखाची संकल्पना फक्त लिंगाभोवती नाही अथवा फक्त लिंगातूनच पूर्ण होते असे नव्हे. केवळ त्यातून पूर्ण कामपूर्तीचा आनंद मिळतो असेही नाही. कामपूर्तीमध्ये स्त्रिच्या इतरही अवयवांना महत्व आहे. त्यातून होणारी कामपूर्ती ही तिला सुख देते, सुखावते. ती आनंदी नसल्यास तुमच्या सोबत ती फक्त जबरदस्तीने सहभागी होत आहे, हे लक्षात घ्यावे. आणि त्यातून मिळणारा कामपूर्तीचा आनंद हा खराखुरा नाही, हेही आता तरी तपासून पहावे.  खरा आनंद उपभोगायचा असेल तर दोघांनी एकमेकांचा आदर करत, एकमेकांच्या मनाला आणि शरिराला समजून घेऊन, एकरूप व्हावे लागेल. आणि मग त्या परमोच्य सुखाच्या आनंदाचा उपभोग मिळेल.
तो दहा पटीने जास्त असेल. दोघांचे कामजीवन उत्साही, आनंदी राहून परिणामी संपूर्ण कुटुंब आनंदात जगेल. 

कामपूर्तीच्या असमाधानामध्ये शास्त्रीय माहितीचा जसा अभाव कारणीभूत आहे, तसेच काही सामाजिक आणि पुरुषसत्ताकतेतील कारणेही अडसर आहेत. तो अडसर स्पष्ट करण्याच्या हेतूने हा लेख लिहिला आहे. सेक्शुअल एज्युकेशन' नावाने सुरू असलेल्या व्हॉट्सअप ग्रुप गेल्या आठवड्यात "स्त्री, पुरुष यांची कामपूर्ती" या विषयावर चर्चा झाली. तो व्हॉट्स ग्रुप परिवर्तनवादी चळवळीतील नचिकेत कोळपकर, रुपाली जाधव, विशाल विमल, मुक्ती साधना या साथींनी सुरू केला आहे. त्यात सर्वाधिक मुलंमुली आणि सर्वच क्षेत्रातील, सर्व वयोगटातील व्यक्ती आहेत. लैंगिकतेबाबत सर्व गोष्टींची शास्त्रीय माहिती देणे आणि लैंगिकतेसंबंधी समाजात निकोप दृष्टिकोन कसा पसरवता येईल यासाठी प्रयत्न करणे, हा या ग्रुपचा उद्देश आहे.

© विशाल विमल
© रुपाली जाधव