◆ ती : पडून, आपटून झालंय. आता नको परत.
● तो : ते तुमचं प्रेम होतं, अस मला तरी वाटत नाही.
आणि प्रेम एकदाच, एकाच व्यक्तीवर होते ही अंधश्रद्धा आहे.
◆ ती : परत तितक्या intensity नं कोणी आवडलंच नाही. तुलना होते नुसती.
● तो : तुलना केली की मग अवघडच. वेगवेगळे गुण, दुर्गुण असतात प्रत्येक व्यक्तीत. मला आता कुणी आवडले तरी मी करेल प्रेम.
◆ ती : बायको झोडपेल नं चांगली.
● तो : नाही, हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे.
◆ ती : असेलही स्वातंत्र्य. पण आपल्या आयुष्याचा जोडीदार वाटून घेण्याएव्हढं मन मोठं नसतं कोणाचंच. म्हणजे असूया निर्माण होतेच मनात.
● तो : नवरा बायको म्हणजे एकमेकांच्या वस्तू नाहीत.
इतरांनी कुणी घ्यायच्या नाही किंवा इतरांकडे जायचं नाही.
--------
● तो : प्रेम, मैत्री, सेक्स या उदात्त भावना आहेत. त्या अमर्याद आहे. समजा, नवराबायको हे कौटुंबिक जबाबदाऱ्या, शारीरिक, भावनिक गरजा एकमेकांच्या पूर्ण करत असतील आणि अजून अन्य ठिकाणी त्यांचे संबंध प्रस्थापित झाले तर त्यात गैर काय आहे.
◆ ती : असं बोलणं सोपं आहे. प्रत्यक्षात करणं कठीण आहे.
● तो : होय, म्हणून तर सांगतो, असे वागायला खूप प्रगल्भता लागते.
◆ ती : तू बायकोला सांगू शकशील की माझे दुसऱ्या कोणाशी संबंध आहेत? आणि ती स्वीकारू शकेल हे? आणि तिनं असं केलं तर तू स्वीकारू शकशील?
● तो : आजवर तर बोलण्याच्या पातळीवर वैयक्तिक आणि जाहीर व्यासपीठावर अशी मांडणी दोघांनी करत, हे मान्य केले आहे. जगण्याच्या पातळीवर अवघड नाही. आणि मी तिला अडविणारा कोण ? आणि तिने दुसरे कुणावर प्रेम केले तर ती माझे काय हिरावून नेत आहे ? माझी बायको म्हणून ती संसारिक जबाबदाऱ्या सांभाळते, त्यापलीकडे तिचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी कोण तिला अडविणारा ?
◆ ती : मन तयार तरी होईल का असं करायला? आनंद तरी वाटेल का मनाला?
● तो : आपल्यावर एकेरी आणि बंदीस्थ संस्कार झाले आहेत. उदात्त संस्कार झाले नाहीत. प्रेम ही भावनाच उदात्त आहे. आई, वडील, भाऊ बहीण यांच्यावर प्रेम करताना नाही हा प्रश्न पडत ? मित्र - मैत्रिणी, प्रियेसी - प्रियकर येथे का हा प्रश्न पडतो ? कारण या प्रेमात लैंगिकतेचा विचार केला जातो. आणि आपल्याकडे लैंगिकतेमध्ये बंदीस्थपणा आणून ठेवला आहे. नॉर्मल विचारच केला जात नाही. खरे तर सेक्सशिवाय मैत्री, प्रेम असे नाते छान तयार होते. पण आपल्याकडे सेक्श म्हणजेच मैत्री प्रेम समजले जाते आणि त्यामुळे खूप बंधने लादली जातात मैत्री प्रेम यावर.....
◆ ती : आपल्या जोडीदारकडून सगळ्या गरजा पूर्ण होत असतील तर आपण इकडे तिकडे का जाऊ?
● तो : खरे तर गरज ही नुसती गरज नाही. प्रेम, मैत्री या उदात्त आणि अमर्याद भावना आहेत. त्या एकाच व्यक्तीकडून पूर्ण होतील हे कुणी सांगितले ?
-----------
◆ ती : मला ती आपल्या जोडीदाराशी केलेली बेईमानी वाटेल. पण तो सक्षम नसेल तर मी जाईन कदाचित दुसरीकडे. कारण आपल्या इच्छा दडपून टाकणं ही स्वतःशी बेईमानी ठरेल.
● तो : हा तुझा विचार फक्त लैगिकतेबाबत आहे. मी तो सोडून मैत्री, प्रेम याचा विचार मांडतोय. मैत्री, प्रेम करण्यात काय गैर आहे. खरे तर सेक्स करण्यात ही काही गैर नाही. पण हा मुद्दा नंतर बोलू.
◆ ती : प्रेम आहे म्हणून शरीर द्यावंसं वाटणं हे सहज आहे. तुला जर कुणाबद्दल प्रेम वाटलं तर तू बायकोला सांगू शकशील मोकळेपणाने?
● तो : 1 लाख 1 टक्के सांगेन. पण तिला सांगायची अथवा तिच्या परवानगीची गरज काय ? असाही माझा प्रश्न आहे
◆ ती : तू सांगेन म्हणतो, पण इतका मोकळा विचार फार कमी लोक करू शकतील. पण तुझा जो दुसरा प्रश्न आहे, त्याबाबत मला असे वाटते की तिला सांगण्याऐवढा मोकळेपणा आणि विश्वास हवा तुमच्या नात्यात?
● तो : पण मला सांग, बायकोला का सांगायचे ? ते माझे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना ? मग मी का सांगायचे ? मी तिच्या बाबतच्या सर्व गोष्टी पूर्ण करतो, तर मग मी तिला त्या पलीकडचे का सांगायचे ? लग्नाअगोदर आपण कुणाशी प्रेम केले, सेक्स केले हे आई-वडील आणि होणाऱ्या बायकोला- नवऱ्याला सांगतो का ?
● तो : समजा एखादी स्त्रीच्या प्रेम मैत्री याबाबतच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. मी वर बोललो तसे. पण त्या स्त्रीच्या नवऱ्याच्या नसतील तर त्या स्त्रीने बाहेर कुणावर प्रेम, मैत्री करायची नाही का ? मग त्या पत्नीचे व्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेले ?
◆ ती : शरीर, मन, आयुष्य हे सगळं share करतोच की आपण आपल्या जोडीदाराशी.
● तो: पण आपल्या शरीर, मन, आयुष्यावर मालकी नसते जोडीदाराची.
◆ ती : मालकी नसतेच त्याची. तो गाजवत नसेलही. पण आपल्याला त्यालाच मालकी द्यावीशी वाटत असेल तर?
● तो : म्हणून तर मी म्हटलो की, आपल्याकडे संस्कार आहे. तो हाच संस्कार की लग्न म्हणजे पती-पत्नी एकमेकांचे मालक
◆ ती : नाही रे. ती प्रेमाची मालकी असते. आपण स्वतःहून देऊ केलेली. त्यासाठी कोणी आपल्यावर जबरदस्ती करत नाही.
● तो : हा हा हा...त्याला मानसिक गुलामी म्हणतात. प्रेम किती आणि भावना, शरिरावर नियंत्रण अर्थात मालकी किती हे पहा. नवराबायकोत प्रेमाची मालकी असती ना तर प्रेमाची अशी असंख्य उदाहरणे सापडली असती. पण नवराबायकोच्या प्रेमाची उदाहरणे फार नाही. याचा अर्थ त्या नात्यात फार प्रेम नसते. असते ती बहुतांशी शारीरिक मालकी आणि लग्नाची गाठ.
◆ ती : असेलही. जाऊ दे, मी झोपतीये
● तो : जाऊ दे म्हणजे ?
◆ ती : झोप फार आलेली. म्हणून म्हटलं रे.
● तो : मला वाटले की तुझी चिडचिड झाली.
◆ ती : नाही नाही.
● तो : Gn
◆ ती : Gn
(टीप : तो आणि ती कोण हे शोधण्यापेक्षा या संवादातील मुद्दे शोधून त्यावर विचार करूया !)
© विशाल विमल
________________
No comments:
Post a Comment