शरीरसंबंधांमध्ये आजही पुरुषांची मक्तेदारी असल्यासारखे त्यांचे वर्तन आहे. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी स्त्रीने शरीरसंबंधांमध्ये स्वतः हुन फार काहीही करायचे नाही, असा अलिखित नियम आहे. जे करायचे ते पुरुषाने स्वतः आणि स्वतःला वाटेल तसे करायचे. मात्र हे पूर्णतः चूक आहे. शरीरसंबंधांला संभोग असा अर्थपूर्ण शब्द आहे. शरीरसंबंधांमध्ये स्त्रीपुरुषांचा समान सहभाग असावा, असा त्यातून अर्थ सूचित होतो. त्यामुळे शरीरसंबंधात स्त्रीपुरुष दोघांचाही समान सहभाग असेल तर पुरुषासह स्त्रीचीही कामपूर्ती समाधानकारक होऊ शकते. शरीरसंबंध ठेवताना काही प्रकारांमध्ये स्त्रियांना थोडा पुढाकार घ्यावा लागतो, ते प्रकार पुरुषांनी माहीत करून घेऊन महिलांचाही शरीरसंबंधामध्ये सहभाग वाढवला पाहिजे. बाईने शरीरसंबंधामध्ये सहभाग, पुढाकार घेतला म्हणजे 'ती बाई नीट चालीची नाही', असा चुकीचा गैरसमज करून घेण्याची अजिबात गरज नाही. खरे तर स्त्रीपुरुष शरीरसंबंधांमध्ये स्त्रीचाही सहभाग असणे हे आवश्यक आहे आणि ती स्त्रीची गरजही आहे. तसेच प्रत्यक्ष शरीरसंबंध करण्याअगोदर पुरुषांनी प्रणय केल्यास स्त्रीही उद्दीपित होते. त्यामुळे ती शरीरसंबंधांत सहभागी होऊन पुरुषांच्या कामपूर्तीचे समाधान वाढू शकते आणि तिलाही समाधान मिळते.
पुरुषांच्या एकूणच कामपूर्तीमध्ये स्त्रीचा सहभाग, पुढाकार महत्वाचा आहे. पुरुषी वर्चस्वासाठी स्त्रीचा सहभाग, पुढाकार नाकारला जाणार असेल तर पुरुषांना कामपूर्तीच्या समाधानालाही मुखावे लागत आहे, हे पुरुष कधी लक्षात घेणार आहेत ? पिढ्यांपिढ्या पुरुषांच्या शरिरसंबंधाच्या मक्तेदारीमुळे तेही कामपूर्तीचे समाधान पुरेपूर घेऊ शकले नाहीत. आणि त्या संबंधात असलेली स्त्री वा अन्य जोडीदारही समाधान घेऊ शकले नाही. त्यामुळे शरीरसंबंधातून मिळणाऱ्या कामपूर्तीच्या समाधानाला संपूर्ण समाजच मुकलेला आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही.
जोपर्यंत स्त्रीला मुक्तपद्धतीने, संकोच न करता वावरण्याचा अधिकार या समाजात दिला जात नाही, तोपर्यंत तीही फुलणार नाही. त्यासाठी स्त्रीला मुक्त आणि निःसंकोचपणे जगू दिले पाहिजे. या निःसंकोचपणे जगण्यातूनच ती शरीरसंबंधांमध्ये पुढाकार घेण्यास तयार होणार आहे. मात्र आजवर स्त्रीच्या लैंगिकतेचा आणि तिच्या निःसंकोचपणे जगण्याचा कधी या पुरुषी व्यवस्थेने विचारच केला नाही. त्यामुळे ती दुसर्यालाही जो काही आनंद देऊ शकते, त्या आनंदाला पुरुषही हजारो वर्ष इथल्या खुळ्या कल्पना, रूढी परंपरामुळे मुकला आहे. हजारो वर्ष स्त्रीला पुरुषी वर्चस्वाने दाबल्यामुळे आणि चुकीच्या रूढी-परंपरांमुळे ती या आनंदापासून स्वतः मुखत आली आहे.
तिच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे. उत्साह आहे. संभोग सुख देण्याची ताकत आहे, हे खास करून पुरुषांनी लक्षात घेण्याची गरज आहे. शरीर सुखाची संकल्पना फक्त लिंगाभोवती नाही अथवा फक्त लिंगातूनच पूर्ण होते असे नव्हे. केवळ त्यातून पूर्ण कामपूर्तीचा आनंद मिळतो असेही नाही. कामपूर्तीमध्ये स्त्रिच्या इतरही अवयवांना महत्व आहे. त्यातून होणारी कामपूर्ती ही तिला सुख देते, सुखावते. ती आनंदी नसल्यास तुमच्या सोबत ती फक्त जबरदस्तीने सहभागी होत आहे, हे लक्षात घ्यावे. आणि त्यातून मिळणारा कामपूर्तीचा आनंद हा खराखुरा नाही, हेही आता तरी तपासून पहावे. खरा आनंद उपभोगायचा असेल तर दोघांनी एकमेकांचा आदर करत, एकमेकांच्या मनाला आणि शरिराला समजून घेऊन, एकरूप व्हावे लागेल. आणि मग त्या परमोच्य सुखाच्या आनंदाचा उपभोग मिळेल.
तो दहा पटीने जास्त असेल. दोघांचे कामजीवन उत्साही, आनंदी राहून परिणामी संपूर्ण कुटुंब आनंदात जगेल.
कामपूर्तीच्या असमाधानामध्ये शास्त्रीय माहितीचा जसा अभाव कारणीभूत आहे, तसेच काही सामाजिक आणि पुरुषसत्ताकतेतील कारणेही अडसर आहेत. तो अडसर स्पष्ट करण्याच्या हेतूने हा लेख लिहिला आहे. सेक्शुअल एज्युकेशन' नावाने सुरू असलेल्या व्हॉट्सअप ग्रुप गेल्या आठवड्यात "स्त्री, पुरुष यांची कामपूर्ती" या विषयावर चर्चा झाली. तो व्हॉट्स ग्रुप परिवर्तनवादी चळवळीतील नचिकेत कोळपकर, रुपाली जाधव, विशाल विमल, मुक्ती साधना या साथींनी सुरू केला आहे. त्यात सर्वाधिक मुलंमुली आणि सर्वच क्षेत्रातील, सर्व वयोगटातील व्यक्ती आहेत. लैंगिकतेबाबत सर्व गोष्टींची शास्त्रीय माहिती देणे आणि लैंगिकतेसंबंधी समाजात निकोप दृष्टिकोन कसा पसरवता येईल यासाठी प्रयत्न करणे, हा या ग्रुपचा उद्देश आहे.
© विशाल विमल
© रुपाली जाधव
No comments:
Post a Comment