तीळ गुळा ऐवजी पुस्तके भेट
सण-समारंभातील कर्मकांड नाकारून त्याला कालसुसंगत पर्याय देता आला पाहिजे, अशी सातत्याने चर्चा होते, पण पर्याय सापडत नाही आणि सापडला तरी त्याची अंमलबाजवणी केली जात नाही. मकर संक्रांती निमित्त तीळ गुळा देण्याऐवजी पुस्तके देण्याची प्रा. सुभाष वाघमारे यांनी सुचविलेली कल्पना आरजू आणि विशाल यांनी 50 पुस्तके भेट देऊन अंमलात आणण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
1) तरुणांनो विचार कराल तर...
- प्रिन्स क्रोपोतकिन
2) मी नास्तिक का आहे
- शहिद भगतसिंग
3) विवेकानंद
- दत्तप्रसाद दाभोलकर
4) देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे
- प्रबोधनकर ठाकरे
ही भेट दिलेली चार प्रकारची पुस्तके आहेत. ही पुस्तके भेट देताना ‘ आयुष्यातील संक्रमणाच्या टप्प्यावर, लाभो दिशादिग्दर्शन, हीच सदिच्छा ! असा संदेश लिहिला आहे.
- विशाल